Download App

राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता, विदर्भ-मराठवाड्याला येलो अलर्ट

  • Written By: Last Updated:

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ (heavy rain) पडत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये फळबागा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट आणखी काही दिवस राज्यावर कायम राहणार आहे. आजही विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. नागपूर, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बैठक बोलावली पण पदाधिकाऱ्यांची दांडी, राज ठाकरे पुण्यातून बैठक न घेताच माघारी परतले 

मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसेच नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीटही होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत आज (सोमवारी) पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर खान्देशात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आधी भ्रष्टाचारी मंडळींवर आरोप करायचे, मग निर्लज्जपणे…; सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकास्त्र 

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. 4 आणि 5 तारखेला आकाश निरभ्र असेल तर 6 आणि 7 तारखेला आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. उद्या सकाळनंतर किमान तापमानात किमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात मुसळधार पाऊस आणि गारपीट

रविवारी उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस झाला. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत मध्यम ते मुसळधार पाऊस झाला, तर काही भागात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

 

follow us