अमरावती : जनतेने मला ज्याप्रमाणे भरभरून प्रेम दिले, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, विकास हेच आपले ध्येय असून मतदारसंघाच्या विकासास प्रथम प्राधान्य असल्याचे मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. नांदगाव पेठ परिसरात महारॅली काढून यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जंगी शक्तीप्रदर्शन केले.
कर्डिलेंचा राहुरीत प्रचार दौरा; नागरिकांशी संवाद, दिला विकासाचा शब्द..
महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ नांदगाव पेठ येथे प्रचार कार्यालयाचे उभारण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो जनतेला यशोमती ठाकूर यांनी संबोधित केले. तिवसा मतदारसंघात जनतेने मला सातत्याने पाठिंबा दिला आहे. परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच मी तत्पर असून भविष्यात नांदगाव पेठ व परिसरातील उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे. नांदगाव येथील औद्योगिक वसाहत आणि परिसराचा ऐतिहासिक विकास करणे, हे माझे स्वप्न आहे. माझा मतदारसंघ विकसित मतदारसंघ म्हणून नावलौकिकास येईल, यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची माझी तयारी आहे. या मतदारसंघातील जनता माझ्या परिवारातील सदस्यासारखी आहे. त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले असून यापुढेही आपला आशीर्वाद असाच कायम राहावा, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी मतदारांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आवाहन केले.
संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहती; प्रचार सभेत बाळासाहेब शिंगाडेंच मत
यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नांदगाव पेठसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक परिसरात यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यशोमती ठाकूर तुम आगे बढो, असा भरभरून प्रतिसाद देत यशोमतीताईंना महिलांनी देखील शुभेच्छा दिल्या. मतदारांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यशोमती ठाकूर चौथ्यांदा विजयी होतील, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.
प्रचार दौऱ्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत नागरिकांना संबोधित केले. मंगळवारी सकाळी खारतळेगाव, धामोरी, वाठोडा शुक्लेश्वर आणि खोलापूर येथे प्रचार दौरा काढून यशोमती ठाकूर यांनी आपली प्रचारातील बढत कायम ठेवली होती. दरम्यान, येत्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून यशोमती ठाकूर नवा विक्रम निर्माण करतील, अशी चर्चा तिवसा मतदार संघात जोरात सुरू आहे.