Download App

नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच, खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, गडचिलोरीत भीतीचे वातावरण

  • Written By: Last Updated:

गडचिरोली : गडचिलोरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडू (Naxalite) हत्यासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (Ramji Atram) (२७, रा. कपेवंचा जि. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल 

घटनास्थळी सापडलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्रकात तो खबरा असल्याचा दावा केला आहे. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपेवंचा येथील रामजी हे त्यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांना रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांना घटनास्थळी टाकलेल्या पत्रात केला आहे. मात्र, तो खबरी नसल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

बुलढाणा : रविकांत तुपकर यांना अटक; सोयाबिन, कापसाचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

दक्षिण गडचिरोलीत महिनाभरात नक्षलवाद्यांनी तीन जणांची हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे 15 नोव्हेंबर रोजी दिनेश गावडे यांची हत्या करण्यात आली होती, तर 23 नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील टिटोला येथील माजी पोलीस पाटील लालसू वेडदा यांची तर शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कपेवंचा येथील रामजी आत्राम यांची हत्या करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून सातत्याने होत असलेल्या हत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत गडचिरोलीत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. पोलिसांनी या आठवड्यात नवीन पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच अतिसंवेदनशील परिसर पिंपरी बुर्गी पोलीस ठाण्याला भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी या पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिवाळी भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी केली. तसेच दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोलीत ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. या सर्व घटनांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यास सुरुवात केल्याचं बोलल्या जातं.

एकीकडे पोलिसांनी नक्षवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम तीव्र केल. त्यासाठी दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात पोलीस मदत केंद्रे आणि पोलीस ठाणी उभारण्याचे काम हाती घेतले. शिवाय, नक्षल विरोधी पोलीस पथक गडचिरोली पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू आहे. मात्र, तरी नक्षलवाद्यांची दहशत अजूनही स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, या हत्या करण्यासाठी नक्षलवाद्यांनी काही गावकऱ्यांची मदत घेतल्याची चर्चाही पोलिस विभागात सुरू होती.

Tags

follow us