Laxman Hake Protest For Mahjyoti Fund : गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात आंदोलन करणाऱ्या ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ज्यावेळी हाकेंना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचेही कॅमेरात कैद झाले आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्याने हाके आंदोलनाला बसले होते. यावेळी हाकेंनी अजित पवारांवर गंभीर आरोपही केले.
त्यांची लायकी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर
अजित पवारांना शिवीगाळ
पोलिसांनी ज्यावेळी हाकेंना ताब्यात घेत गाडीत बसवले त्यावेळी हाकेंनी अजित पवार आमच्या मुलांनी शिकू देत नसून आमच्या महाज्योतीच्या (Mahajyoti Schem) पोरांना पैसे देत नसल्याचा गंभीर आरोप करत आवार्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड मिळाले पाहिजे अशी मागणी हाकेंनी केली. यापूर्वीदेखील हाकेंनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘महाज्योती’ संस्थेच्या निधी आणि पीएचडी शिष्यवृत्तीच्या प्रलंबित मागणीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओबीसी समाज वाळीत टाकेल, असा गंभीर इशाराही हाकेंनी दिला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
ओबीसी समाज यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही
ओबीसी समाजाला यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. जे जे खासदार आमदार मनोज जरांगे पाटील यांना भेटतात, त्यांची यादी आम्ही बनवली असल्याचा दावाही हाकेंनी एकदिवस आधी केला आहे. तसेच दुसरीकडे बारामतीच्या माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी सभासदांना पैसे वाटले असा गंभीर आरोप करत हाकेंनी खळबळ उडवून दिली आहे.