Download App

Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला

Vidhansabha Election मध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार? याबद्दल पवारांनी भूमिका स्पष्ट केली ते लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलत होते.

Vidhansabha Election Sharad Pawar MVA Seat Allocation Formula : आमच्या लोकसभेतील विजयामध्ये छोट्या पक्षांनी जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला. धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आता आमचं तीन पक्षांचं कर्तव्य आहे की, त्यांनाही जागा (Seat Allocation) देणे. असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेत महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार? याचा डिटेल फॉर्म्युला सांगितला. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्याशी संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला.

Varali Hit and Run प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शहा ताब्यात तर मुलासह ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

यावेळी पवार म्हणाले की, आमचं आताचं धोरण विधानसभेचं तीन मुख्य पक्ष आहेत. तिघांची शक्ती जवळपास समान कमी जास्त प्रमाणात आहे. या सगळ्यांमध्ये समान आकडा ठरवून आम्ही वाटप करू शकतो. माझं म्हणणं त्याच्यात असं आहे की, आम्ही जसं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष यात आहे. माझ्या नेतृत्वाखालचा पक्ष यात आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस यामध्ये आहे. या सगळ्यांशिवाय इतरही काही लहान घटक आहेत ज्यांनी कालच्या निवडणुकीत निवडणूक लढली नाही.

वैजूचं लग्न रणविजयशी झालं खरं पण ‘माटी से बंधी डोर’ मध्ये येणारे नवा ट्विस्ट!

जागा मागितल्या नाहीत पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. उदा. शेतकरी कामगार पक्ष रायगड असेल सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणं असतील त्यांची काही मतं आहेत. किंवा सीपीएम असेल आज आपण डहाणू वगैरे भागात गेलो आजही त्यांचे आमदार आहेत.आपण नाशिक जिल्ह्यात गेलो तर आजही तेथे त्यांची लोकं आहेत. किंवा अन्य ठिकाणी डावे कम्युनिस्ट उजवे कम्युनिस्ट. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष की ज्यांच्याकडं आताही दोन तीन आमदार आहेत. या सगळ्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला.

…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आता आमचं कर्तव्य असं आहे तीन पक्षांचं. की लहान पक्ष असेल धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेतात आमच्या दृष्टीने अनुकूल भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे सगळ्या जागा आम्ही घेणं योग्य नाही आम्हाला त्यांना सुद्धा जागेच्या संदर्भात सहभागी करून घ्यावं लागेलं. एकत्र निवडणूक राज्य कसं आणता येईल यावर आमच्या सगळ्यांचं लक्ष राहिल.

जे नाव होतं प्रकाश आंबेडकर ज्यांच्याशी तु्म्ही चर्चा करत होतात. त्यांनी स्वतंत्र लढून त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांच्याबाबत आता महाविकास आघाडीची काय भूमिका असू शकेल. आम्ही नेहमीच त्यांच्याबद्दल समजुतीची समंजसपणाची भूमिका घेतली पण त्यांची जी अपेक्षा होती ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आणि ती पूर्ण करू न शकल्यानेच आम्ही वेगळे लढलो. आता उद्याच्या निवडणुकीत सुद्धा त्यांची भूमिका एकला चलो रे ची दिसते. त्यामुळे ही जर भूमिकाच त्यांनी घेतली असेल तर त्यांच्यात आमच्यात एकवाक्यता होणार नाही.

follow us