Bawankule on Wadettiwar Statement : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. दहशतवाद्यांना पांघरूण घालणाऱ्यांचा प्रयत्न ते करत आहेत का असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. (Statement) त्याचबरोबर देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा, काँग्रेसचा हा दुटप्पीपणा आहे असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत दहशतवाद्याला जात-धर्म नसतो असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? असा प्रश्न उपस्थित करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे असंही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही.
काय म्हणाले वडेट्टीवार?
हिंदु आहे का, असं विचारून मारल्याचा आरोप पर्यटक करत आहेत. पण, दहशतवाद्यांकडे इतका वेळ होता का, कानात येवून धर्म विचारणार. दहशतवाद्यांचा कोणता जात धर्म नसतो. या प्रकरणात दोषींवर त्वरीत कारवाई करावी. इतर कोणताही रंग देऊ नये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.