Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली,यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
महाज्योती कडून राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण ऑफलाईन करावे
तर दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती मार्फत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. आता ही योजना ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. जी संस्था हे काम करणार ती राजस्थानची आहे,त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन देण्याची मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली.
EPFO Rules : लग्नासाठी PF मधून किती पैसे काढू शकतात? जाणून घ्या ‘हे’ नियम
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्याने त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी काल आंदोलन देखील केले. यावर्षी महाज्योतीला जो निधी दिला आहे तो कमी आहे.. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा तसेच महाज्योतीचे गेल्यावर्षीचा निधी देखील प्रलंबित आहे. तो ही देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
