Vilas Lande Reaction On Chhagan Bhujbal Not Get Minister Post : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यानंतर भुजबळ समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरूद्ध जाहीर नाराजी व्यक्त केलीय. अजित पवार विरूद्ध छगन भुजबळ हा संघर्ष नवा नाहीये. 2009 साली जेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते, तेव्हा देखील हा संघर्ष पाहायला मिळाला होता. तेव्हाचे साक्षीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी देखील या संघर्षावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
विलास लांडे 2009 सालच्या संघर्षावर बोलताना म्हणाले की, त्यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. त्या काळात शरद पवार साहेबांनी तो निर्णय घेतला (Maharashtra Politics) होता. प्रफुल पटेल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे देखील त्यावेळी होते. सर्वानुमते भुजबळ साहेबांची निवड झाली होती. त्यावेळी देखील मला का संधी देत नाही, म्हणून अजितदादा नाराज होते. त्यावेळी अजित पवारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केली. नंतरच्या कालखंडात आदर्श घोटाळा समोर आला, त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भुजबळ साहेबांना देखील राजीनामा द्यावा लागला होता.
बाबासाहेबांचा अपमान! शाहांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट; CM फडणवीसांनी दुसरी बाजू मांडली
त्यानंतर आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला, या सर्व घटनेचा मी साक्षीदार आहे. मी सह्या गोळ्या करत होतो. जयंत पाटील, आर आर पाटील, विजयसिंग मोहिते पाटील आणि छगन भुजबळ, असे चारजण उत्सुक होते असं विलास लांडे म्हणाले आहेत. काम करणारा नेता हवा होता, आमच्या पाठीशी उभा राहणारा खंबीर नेता हवा होता, यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली. त्या घटनेचा देखील मी साक्षीदार आहे. त्यावेळी समजलं की, 90 टक्के कार्यकर्ते अजित पवार यांच्या समर्थनार्थ होते. मग बैठक रद्द करून एकमताने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. छगन भुजबळ उपमुख्यंमंत्रिपदावर असताना त्यांना हटवून अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं.
Video: राहुल गांधींनी केंद्र सरकारला महागाईवरुन घेरलं; बाजारात लसणाचा भाव विचारताच झाले अवाक
सर्व आमदारांनी त्यावेळी सांगितलं की, छगन भुजबळ यांना हटवावं आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री करावं. विजय लांडे म्हणाले की, काम करणाऱ्या व्यक्तीला संघर्षाला सामोरं जावं लागतं. अजितदादा हे काम करणारी व्यक्ती आहेत. त्यामुळे अजितदादांना नेहमीच संघर्षाला सामोरं जावं लागतं. स्वत:साठी झटणारा नेता नसून लोकांसाठी काम करणारा आहे. म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिलाय. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांनी भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही, यावर बोलताना लांडे म्हणाले की एकाच व्यक्तीच्या घरात किती मंत्रीपदं द्यायची? ओबीसी समाजात त्यांनी कोणता नेता मोठा केला? किती लोकांना मोठं केलं, किती लोकांना मंत्री केलं? असा सवाल आता ओबीसी समाज विचारत आहे.
छगन भुजबळ यांनी आता अजित पवार यांच्या मागे उभं राहावं. त्यांना सपोर्ट करावा अशी इच्छा विलास लांडे यांनी व्यक्त केलीय. 2009 साली अजित पवार उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक होते मात्र त्यावेळी भुजबळांनी मोठी ताकद लावली. पद पदरात पाडून घेतलं. याचाच वचपा काढत अजित पवार यांनी आता भुजबळांना मंत्रिपदातून डावलून घेतला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.