Vinayak Raut Challenge to Narayan Rane MP : नुकतेच लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेले भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या खासदारकीला शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आव्हान दिलं आहे. यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मी दिमागाने खेळतो, फडणवीस, शिंदे, अजितदादांना डावात हरवलं, शांतता रॅलीत पाटलांचा हल्लाबोल
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आव्हान दिला आहे. राऊत यांनी राणे यांच्या खासदारकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे. नारायण राणे यांनी मिळवलेल्या विजय हा मत विकत घेऊन आणि मतदारांना धमकी देऊन मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा हा विजय रद्द करण्यात यावा. तसेच त्यांनी निवडणूक काळात केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. अशी मागणी याचिकेमध्ये विनायक राऊत यांनी केली आहे.
मी कुठेही संधी शोधणार नाही, कुठेच जायची इच्छा नाही; रावसाहेब दानवे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत !
देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये 7 मे रोजी निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये राणे यांना चार लाख 48 हजार 514 मतांनी विजय मिळाला होता. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असलेले विनायक राऊत त्यांचा 47 हजार 858 मतांच्या फरकाने पराभव झाला होता.