Ketan Agarwal Case  : केतन केसांचा विग घालत होता? वडिलांनी सर्वकाही सांगितलं

Ketan Agarwal Case  : संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत असल्याने

 Ketan Agarwal Case

 Ketan Agarwal Case

 Ketan Agarwal Case  : संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. पोलिसांकडून दोघांचीही सखोल चौकशी सुरु असून आता आणखी एक नवीन खुलासा झाला आहे.

केतन अग्रवालला (Ketan Agarwal Case) टक्कल होते त्यामुळे तो केसांचा विग घातल होता यामुळे ही बाब समजल्याने सियाला केतनशी लग्न करायचा नव्हता अशी माहिती समोर आली आहे. सियाच्या या दाव्यानंतर आता केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल अग्रवाल यांनी आज न्याय मागण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) म्हणाले की,  मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने केली जाईल. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची (SIT) देखील स्थापना करण्यात आली आहे.

केतन विग घालत होता हे सियाच्या कुटुंबीयांना माहिती – विशाल अग्रवाल

तर सियाने केलेल्या दाव्यावर बोलताना विशाल अग्रवाल म्हणाले की, आम्ही त्यांना (सियाच्या कुटुंबीयांना) माहिती दिली होती की, केतन केसांचा विग घालत होते. एखाद्याची हत्या करण्यासाठी हे काही कारण असू शकते का? असं माध्यमांशी बोलताना विशाल अग्रवाल म्हणाले.

प्रकरण काय ?

18 जून रोजी पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांची लोहगड किल्ल्यावरुन दरीत ढकलून केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरी मिळून हत्या केली होती. या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक केली आहे.

Exit mobile version