Vishwas Patil : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांची निवड करण्यात आलीयं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनने संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिलीयं.
पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?
पु्ण्यात आज साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठावाडा साहित्य परिषदेचे दादा गोरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.
विश्वास पाटील यांच्या संपादकीय शैली अप्रतिम आहे. सखोल संशोधन, भाषेची ताकद, घटनांच्या चित्रणातील नाट्यमयता तसेच मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन त्यांच्या लिखमातून घडते. पानिपत सारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. विविध ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज, पत्रव्यवहार, तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंफले आहेत. यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या बिनचूक वाटते.