Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडावर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात ईडीची (ED) स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते अमेय तिरोडकर (Amey Tirodkar) यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जवळचा आहे आणि या प्रकरणात देखील कॅबिनेट मंत्र्यांचे नाव सातत्याने येत असल्याने पोलीस तपासाला मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडून स्वतंत्र करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. याचबरोबर या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे. गेल्या काहीदिवसांपासून वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या संबंधित अनेक कंपन्याचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता, संपत्तीबद्दल देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात निवडणुक आयोगाला देखील प्रतिवादी करण्यात यावे अशी मागणी देखील या याचितेच उपस्थित करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात वाल्मिक कराडावर मकोका लावण्यात आला तेव्हापासून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाहीतर न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktai : प्रतीक्षा संपली…, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ 18 एप्रिलला भेटीला
अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना या भेटी दरम्यान धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधांचे अनेक पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.