Maharashtra Rain Alert : जुलै महिन्यांच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही जिल्ह्यात आता देखील रिमझिम पाऊस सुरु आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने 6 जुलैपासून विश्रांती घेतली आहे. तर आजपासून बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला पावसाचा पट्टा आता पूर्वेकडे सरकत असल्याने आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
फ्रान्सची सलग तिसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; मोरोक्कोचा पराभव –
तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात प्रवेश केल्याने आता मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाला असून यावर्षी 9 जुलैनंतर देशाच्या सर्व भागात मान्सून पोहोचल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
