Weather Update 5 February 2024 : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतुचा अंदाज बांधणं कठीण आहे. एकीकडे देशभरात थंडी वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळँ मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उर्वरित भागातही थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडी परतली आहे. मात्र, उत्तर भारतात तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज 5 फेब्रुवारी रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. IMD नुसार, दिल्ली, हरियाणा, पंजाब, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळं वातावरणात गारवा तयार झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहिल, असं भारतीय हवामान खात्याने सांगितले
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
पुढच्या २४ तासात या भागात पाऊस
स्कायमेटच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत पश्चिम हिमालयाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. यासोबतच उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पूर्व आसाममध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
दिल्लीत आज येलो अलर्ट
देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस दिल्लीत आणखी धुके पडेल. सोमवारी दाट धुक्यासह अंशत: ढगाळ वातावरण राहिल. त्यामुळे हवामान खात्याने सोमवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवारनंतर आकाश निरभ्र होईल. त्यानंतर किमान तापमान पुन्हा एकदा चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून पहाटे पुन्हा थंडी वाढू शकते आणि बुधवारी किमान तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.