Download App

Weather Update : अवकाळीचं संकट कायम! पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाने (Weather Update) रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. आणखी काही दिवस अवकाळीचं सकंट कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत (Rain Alert) आहे. आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई भागात ढगाळ वातावरण होते. पुढील 24 तासांत राज्यात काही जिल्ह्यांत ढगाळ हवामान तर काही जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Weather Update : थर्टी फर्स्टला पाऊस! पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज काय?

महाराष्ट्राप्रमाणेच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण भारतातच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तास महत्वाचे आहेत. या पावसामुळे राज्यातील रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील नाशिक, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यांत पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नगर शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान दिसत आहे. थंडीही कमी झाली आहे. या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल आहे. हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. पुण्यात मात्र आज ढगाळ वातावरण राहू शकते. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदे आणि छत्तीसगड या राज्यांत आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच या राज्यांतही पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

follow us