Rain Alert : सावधान! पुढील 48 तासांत अवकाळी कोसळणार; ‘या’ राज्यांना अलर्ट जारी
Rain Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने (Rain Alert) जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजही पावसाची शक्यता कायम आहे. त्यातच हवामान विभागाच्या (Unseasonal Rain) नव्या अंदाजाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी
खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड, रायलसीमा या भागात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. तसेच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप या राज्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. 8 जानेवारी रोजी मध्य प्रदे आणि राजस्थानात काही ठिकाणी हलके ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
नगरमध्ये पावसाची बॅटिंग
धुळे, नंदूरबार येथेही रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत शुक्रवार आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज नगरमध्ये खरा ठरला. शनिवारी सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच आज सकाळीही हलका पाऊस झाला. पावसामुळे काल रात्री बराच वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या नगर शहरात थंडी वाढली आहे. नगरमध्ये इतकी थंडी कधीच पडत नाही. परंतु, सध्या हवामान बदलाचा अनुभव नगरकर घेत असून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात आता पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
Rain Alert : ऐन हिवाळ्यात पाऊस! राज्यात ‘या’ भागात पावसाचा अलर्ट
हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. पुण्यात मात्र आज ढगाळ वातावरण राहू शकते. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदे आणि छत्तीसगड या राज्यांत आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच या राज्यांतही पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.