Download App

Weather Update : सावधान ! आजही मुसळधार पाऊस; हवामानाचा अंदाज काय ?

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून (Weather Update) पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आजही काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे शहरातही आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकूणच राज्यात आजही अनेक ठिकाणी  जोरदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

याव्यतिरिक्त हवामान विभागाने विदर्भातील (Weather Update) काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील दोन दिवसात कोकण आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. या व्यतिरिक्त अन्य भागातही आज दमदार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर जास्त राहिल. नगर शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. शहरात आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहेच.

पुढील दोन दिवसात मुसळाधार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समुद्रातील तीव्र कमी दाबाचा पट्टा जमीनीवर आल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. साधारण 4 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान शास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी सांगितले की, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Uday Samant : माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले…; भावाच्या ठाकरे गटाच्या प्रवेशावर सामंत म्हणाले…

Tags

follow us

वेब स्टोरीज