Download App

उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशीचा पारा ओलांडला आहे. उकाड्यामुळं अंगाची लाही-लाही होत आहे. अशातच उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.

Sonalee Kulkarni : अवतरली सुंदरा! निळ्या सिल्क साडीत सोनाली कुलकर्णी 

राज्यात आज आणि पुढील काही दिवस उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहील. तर पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत काही भागात वादळीवाऱ्यासह गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल 

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास) वाहण्याचा अंदाज आहे. 5 आणि 6 तारखेला विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 7 तारखेला चंद्रपूर मेघगर्जना, विजांचा कडकटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. 9 मे पर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6 आणि 7 रोजी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 आणि 7 रोजी नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील. त्यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज नांदेड आणि लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील तीन दिवस धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.

Supriya Sule : कोणी मायका लाल पवार साहेबांना संपवू शकत नाही; सुळेंनी ठणकावलं | LetsUpp Marathi

मुंबईत तापमानात वाढ

दुसरीकडे, मुंबईसह उपनगरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

follow us