Mansoon Update : मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झालेल्या (Maharashtra Weather Update) नागरिकांसाठी गुडन्यूज आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा एक आठवडा (Monsoon Update) लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून आजच दाखल झाल्याची माहिती आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करील अशी शक्यता आहे.
मान्सूनचे आगमन केरळमध्ये त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच होण्याची शक्यता आहे असे पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. राज्यात सध्या उकाडा कमी झाला आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. आजही काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे.
उत्तर प्रदेशातील हवामानाचा पॅटर्न प्रदेशानुसार बदलू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि जोरदार वारे तर पूर्व उत्तर प्रदेशात तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. लखनौमध्ये कमाल तापमान 41 अंश आणि किमान 29 अंश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.बिहारमध्ये उष्णतेची लाट कायम राहील.
पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः उत्तरेकडील भागात, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील. दक्षिणेकडील भागात हलका पाऊस आणि जोरदार वाऱ्यासोबत हवामान खात्याने उष्णता आणि आर्द्रतेमुळे अस्वस्थतेचा इशारा दिला आहे. राजस्थानमधील हवामान कोरडे आणि उष्ण राहील. काही भागात हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!