Download App

आजपासून पावसाचे धुमशान! ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Weather Update : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा फारसा (Maharashtra Rain) जोर दिसला नाही. आता मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy Rain) व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. नगर शहरात रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस झाला.

हवामान विभागाच्या (Weather Update) ताज्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे.

Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा होणार सक्रीय; वाचा आजचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पुनरागमन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 26 ते 3 ऑक्टोबर या काळात दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर जास्त राहिल अशी शक्यता आहे. तसेच 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका

राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

Maharashtra Weather : राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा

follow us