Download App

Weather Update : ‘अवकाळी’चा मुक्काम वाढला! 24 तासांत ‘या’ भागात मुसळधार

Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने कहर केला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Weather Update) पाऊस झाला. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस असाच  (Rain Alert) कायम राहणार असल्याची चिन्हे हवामान विभागाच्या नव्या अंदाजावरून दिसून येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 12 जानेवारीपर्यंत पाऊस कायम (Unseasonal Rain) राहू शकतो. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांना मात्र मारक ठरत असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Weather Update : थर्टी फर्स्टला पाऊस! पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज काय?

काल दुपारी नगर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पाऊस जोरदार होता. दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता. या पावसाबरोबरच हवेतील गारठा प्रचंड वाढला होता. अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रात्री पाऊस थांबला. त्यानंतर आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

खासगी हवामान एजन्सी स्काटमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील काही जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान, दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप (Lakshadweep) या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम राजस्थान या राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाणा या राज्यांतही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

 

follow us