1000 bed state of the art hospital approved at Pandharpur: मुंबईः राज्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत ( Health Minister Dr. Tanaji Sawant
) यांच्याकडून जोरदार काम सुरू आहे. त्यानुसार शहरीभागाबरोबर ग्रामीण भागातील सार्वजनिक रुग्णालयांना नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. तेथील आरोग्य सुविधाही वाढविण्यात आल्या आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूरला (Pandharpur) लवकरच एक हजार खाटांचे एक अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. या घोषणेची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.(1000 bed state of the art hospital approved at Pandharpur: Information from Health Minister dr. Tanaji Sawant)
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी; नाना पटोलेंची खोचक टीका
पंढरपूरला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी आणि कार्तिकीवारीच्या काळात तर वारकऱ्यांची संख्या आणखी वाढते. मात्र, सध्याचे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या गर्दीला पुरेसे नव्हते. तीर्थक्षेत्र पंढरपूर हे धार्मिकस्थळ आहे. येथे नेहमीच भाविकांची मोठी संख्या असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
‘लाडकी बहिण योजने’चा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं; रुपाली पाटलांची खडसेंना चपराक
याची दखल घेत आषाढीवारी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंढरपूर येथे या रुग्णालयाच्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आणि आता या रुग्णालयाला राज्य सरकारची विशेष मंजुरी मिळाली आहे.
कुठल्या सुविधा मिळणार ?
या नवीन रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. येथे आपत्कालीन सेवा, ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन थिएटर, लॅब, एक्स-रे आणि इतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांच्या सुविधा असतील. या रुग्णालयाचा फायदा पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना होईल. विशेषतः आषाढी आणि कार्तिकीवारीच्या काळात येणाऱ्या लाखोंच्या संख्येतील वारकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या रुग्णालयाचे काम देखील लवकरच सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.