आषाढीसाठी रेल्वेची खास व्यवस्था, वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या कधी-कुठे धावणार वाचा सविस्तर…

आषाढीसाठी रेल्वेची खास व्यवस्था, वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या कधी-कुठे धावणार वाचा सविस्तर…

Aashadhi Wari 2024 Special train arrangement for Warkari : आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari 2024) वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यात अनेक विठ्ठल भक्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने रेल्वे आणि बसने प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. याच वारकऱ्यांसाठी आता रेल्वेने खास व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या (Special train ) धावणार आहेत.

Video : वडेट्टीवारांना उत्तर देताना अजितदादांचा शायराना अंदाज; सभागृह खळखळून हसलं!

पंढरपुर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गंतव्य थांब्यामध्ये विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी विशेष गाड्या मिळणार आहेत. त्यामध्ये कोण-कोणत्या गाड्या कधी धावणार आहेत? याचं सविस्तर वेळापत्रक रेल्वेकडून देण्यात आलं आहे.

वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या धावणार…

यामध्ये नागपूर ते मिरज, न्यू अमरावती ते पंढरपूर, खामगाव ते पंढरपूर, भुसावळ ते पंढरपूर, लातूर ते पंढरपूर, मिरज ते पंढरपूर, मिरज ते कुर्डूवाडी या गाड्यांचा समावेश आहे. तरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक आणि श्रद्धाळू यांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी; ‘माझ्या लेकरांना आरक्षण द्या’ चिठ्ठी लिहून ठेवत केली आत्महत्या

1) गाडी क्र. 01205 नागपूर-मिरज : नागपूरहून 14.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल. 15.07.2024 सकाळी 11.55 वा मिरजला पोहोचेल.

2)गाडी क्र. 01206 मिरज -नागपूर : मिरजहून 18.07.2024 ला दुपारी 12.55 वा सुटेल. 19.07.2024 दुपारी 12.25 वा नागपूरला पोहोचेल.

थांबे : अंजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड ,ढालगाव ,कवठेमहाकाळ ,सलगरे , आरग ,मिरज.
संरचना: 08 स्लिपर +07 जनरल +1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकुण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या

3)गाडी क्र. 01207 नागपूर-मिरज : नागपूरहून 15.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल. 16.07.2024 सकाळी 11.55 वा मिरजला पोहोचेल.

4)गाडी क्र. 01208 मिरज -नागपूर : मिरजहून 19.07.2024 ला दुपारी 12.55 वा सुटेल. 20.07.2024 दुपारी 12.25 वा नागपूरला पोहोचेल.

थांबे : अंजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड , ढालगाव ,कवठे महांकाळ, सलगरे, आरग ,मिरज.
संरचना: 14 स्लिपर +2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या

5) गाडी क्र. 01119 न्यू अमरावती –पंढरपूर : न्यू अमरावतीहून 13.07.2024 आणि 16.07.2024 ला दुपारी 02.40 ला सुटेल. 14.07.2024 आणि 17.07.2024 सकाळी 09.10 वा पंढरपूरला पोहोचेल.

6) गाडी क्र. 01120 पंढरपूर – न्यू अमरावती : पंढरपूर 14.07.2024 आणि 17.07.2024 ला संध्याकाळी 07.30 ला सुटेल. 15.07.2024 आणि 18.07.2024 ला दुपारी 12.40 वा न्यू अमरावतीला पोहोचेल.

थांबे : बडनेरा , मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा ,मलकापूर,बोदवड , भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,पंढरपूर.

संरचना: 07 स्लिपर +07 जनरल + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत 02 एसएलआर= एकुण 18 कोचेस
एकूण 02+02= 4 फेऱ्या.

7) गाडी क्र.01121 खामगाव –पंढरपूर : खामगावहून 14.07.2024 आणि 17.07.2024 ला सकाळी 11.30 वा. ला सुटेल. 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वा पंढरपूरला पोहोचेल.

8)गाडी क्र.01122 पंढरपूर -खामगाव : पंढरपूरहून 15.07.2024 आणि 18.07.2024 ला पहाटे 5 वा. सुटेल. त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता खामगावला पोहोचेल.

थांबे : जलंब, नांदुरा ,मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी आणि पंढरपूर.

संरचना: 07 स्लिपर +07 जनरल+ 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस.
एकूण 02+02= 4 फेऱ्या.

9 )गाडी क्र. 01159 भुसावळ- पंढरपूर : भुसावळहून 16.07.2024 ला दुपारी 01.30 वा. सुटेल. 17.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वा पंढरपूरला पोहोचेल.

10) गाडी क्र. 01160 पंढरपूर-भुसावळ : पंढरपूरहून 17.07.2024 ला रात्री 10.30 वा सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 01.00 वा भुसावळला पोहोचेल.

थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई ,कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.
संरचना: : 05 स्लिपर +11 जनरल+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस.

11) गाडी क्र.01101 लातूर-पंढरपूर-लातूर : लातूरहून 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024 आणि 19.07.2024 रोजी सकाळी 7.30 वा सुटेल. पंढरपूरला अनुक्रमे त्याच दिवशी दुपारी 12.30 वा पोहोचेल.

12)गाडी क्र.01102 पंढरपूर -लातूर-पंढरपूर : पंढरपूरहून 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024आणि 19.07.2024 रोजी दुपारी 01.50 वा सुटेल. लातूरला अनुक्रमे त्याच दिवशी रात्री 07.20 वा पोहोचेल .

थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री,कुर्डूवाडी, मोडनिंब.
संरचना: 08 स्लिपर+ 04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14.
एकूण 05+05=08 फेऱ्या.

13) गाडी क्र.01107/01108 मिरज-पंढरपूर-मिरज : 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यंत धावेल.
– मिरजहून पहाटे 05.00 वा. सुटेल, पंढरपूरला सकाळी 07.40 वा पोहोचेल.
– पंढरपूरहून सकाळी 09.30 वा. सुटेल, मिरजला दुपारी 01.50 वा पोहोचेल.

थांबे : अरग, बेलंकी, सलगरे,कवठेमहांकाळ, लंगरपेट, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव,जवळा, वासुद, सांगोला.
संरचना: 12 डब्यांची मेमू .
एकूण 10+10=20 फेऱ्या.

14) गाडी क्र.01209 /01210 मिरज- कुर्डूवाडी -मिरज : 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यन्त धावेल.

– मिरजहून दुपारी 03.10 वा. सुटेल, कुर्डूवाडी येथे सायंकाळी 07.00 वा पोहोचेल.
-कुर्डुवाडीहून रात्री 09.25 वा सुटेल, मध्यरात्री 01.00 वा मिरज येथे पोहोचेल.

थांबे : अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ , लंगरपेट, ढालगाव,जत रोड , म्हसोबा डोंगरगाव, जवळा ,वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब.

संरचना: 12 डब्यांची मेमू, एकूण 10+10=20 फेऱ्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज