शिंदेंना विनंती करत ‘त्या’ वारकऱ्याने दिला ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद…

शिंदेंना विनंती करत ‘त्या’ वारकऱ्याने दिला ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद…

Aashadhi Wari 2023 : यंदाची आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. त्यातच 2020 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शासकीय पूजा करण्याचा मान मिळालेले विठ्ठल बडे यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री होते. अशी भावना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना 2024 साली मुख्यमंत्री होण्यासाठी आशीर्वाद असल्याचेही यावेळी विठ्ठल बडे यांनी सांगितलं आहे. (Warkari Blessing Udhav Thackery for CM and requet to CM shinde )

बोकड सोसायटीत आणल्याने दोन गटात घमासान; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी महापूजा केली होती. त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळालेले विठ्ठल बडे यांनी उद्धव ठाकरे हे चांगलेच मुख्यमंत्री होते. अशी भावना व्यक्त केली आहे. राजकारणात ते मोठे होतील. असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे माणूस म्हणून, मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत होते. ते असं काम करत राहिले तर ते मुख्यमंत्री होतील. त्याचबरोबर आपला त्यांना आशीर्वाद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

फॉर्म्युला ठरला! सिद्धीविनायक शिंदेंना, शिर्डी देवस्थान भाजपला, महामंडळांचे वाटप पूर्ण

कोण आहेत विठ्ठल बडे?

आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरच्या विठ्ठ्लाच्या महापूजेचा मान हा राज्याच्या मुख्य मंत्र्यांना असतो. तर यावेळी मानाचा वारकरी म्हणून एका वारकरी दाम्पत्याला देखील मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या पूजेचा मान दिला जातो. त्यामुळे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना विठ्ठल बडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पहिली महापूजा केली होती. बडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर (पांगुळ) या गावचे रहिवासी असून ते गेल्या आठ वर्षापासून पांडुरंगाच्या मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देतात. त्यांचं वय 87 वर्षे असून आतापर्यंत त्यांनी 61 वर्ष पंढरपूरची वारी केली आहे.

काय म्हणाले विठ्ठल बडे?

उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळालेले विठ्ठल बडे यांनी ठाकरे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हटले की, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपली विचारपूस केली होती. ते चांगेले आहेत. त्यांना 2024 ला मुख्यमंत्री होण्यासाठी आणि पुन्हा विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळावा हा अशीर्वाद दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी चंद्रभागा नदी आणि पंढरपुरातील स्वच्छतेकडे मुख्यमंत्री शिंदेंनी लक्ष द्यावे. अशी कळकळीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube