सांगली : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. नगरसेवक विजय ताड आपल्या इनोव्हा गाडीतून असताना हल्ले खोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्यात विजय ताड यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील सांगोला रोडवर अल्फान्सो शाळेजवळ घडली आहे. ही भरदिवसा घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक विजय ताड हे आपल्या गाडीतून जत शहराजवळ सांगोला रोडवर असलेल्या अल्फोन्सा शाळेत आपल्या मुलांना आण्यासाठी जातं होते. यावेळी हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते विजय ताड यांची इनोव्हा कार गाडी जेव्हा शाळेच्या जवळ पोहचली त्यावेळी त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला होता. नेमकं त्याच दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला अडवले आणि दोन – तीन बंदूकधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड देखील घातला या हल्ल्यात विजय ताड जागीच ठार झाले. या घटनेमुळे जत शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
World Sleep Day : कंपनीकडून कर्मचाऱ्यांना थेट झोपेसाठी सुट्टी, कारण जाणून व्हाल थक्क
नगरसेवक विजय ताड यांच्यावर हा हल्ला नेमकी कोणी केला याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर ताड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच पोलीस देखील तातडीने येथे पोहचले आहे. सांगलीचे एसपी बसवराज तेली देखील घटनेचे गांभीर्य लक्षातघेत सांगलीवरून जतकडे रावण झाले आहेत.