World Sleep Day : कंपनीकडून कर्मचाऱ्यांना थेट झोपेसाठी सुट्टी, कारण जाणून व्हाल थक्क
बंगळुरू : अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देत असतात. यामध्ये सुट्ट्या हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामध्ये आता बंगळुरूमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना थेट झोपेसाठी सुट्टी दिली आहे. या कंपनीची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ही सुट्टी देण्यामागील कारण देखील तसंच आहे. आज World Sleep Day म्हणजेच झोपेचा दिवस आहे. त्यानिमित्त या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना थेट झोपेसाठी सुट्टी दिली आहे.
भारतात अशाप्रकारे कधीही कर्मचाऱ्यांना झोपेसाठी सुट्टी देण्यात आली नव्हती. वेकफिट सोल्यूशन्स असं या बंगळुरूमधील कंपनीच नाव आहे. World Sleep Day निमित्त या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची झोप पुर्ण व्हावी यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. या कंपनीने लिंक्डइनवर आपल्या कर्मचाऱ्यांना या सुट्टीचा मेल केल्याचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
Marathi Movie : ‘घर, बंदूक, बिरयानी’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !
या मेलमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, ही सर्व कर्मचाऱ्यांना सप्राईज सुट्टी देण्यात आली आहे. कंपनीने तुम्हाला दिलेल्या या झोपेच्या गिफ्टचा अनुभव घ्या. असंही सांगण्यात आलं आहे. तसेचं World Sleep Day निमित्त ही सुट्टी देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा विकेंड थेट तीन दिवसांचा झाला आहे. आज शुक्रवारी World Sleep Day निमित्त सुट्टी तर पुन्हा दोन दिवस आठवड्याची सुट्टी असणार आहे.