कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ करण्याचे प्रकार समोर आले आहेत. लग्न जमवित असताना ९६ कुळीचा बाऊ न करता सर्व मराठा एक आहोत हे दृढ करा, असेही आवाहन कोल्हापुरातील मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.
‘जो घर नहीं संभाल सके…’; राम कदमांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
मराठा समाजाच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी हा मेळावा पार पडला.
गुलाबराव पाटलांना ट्रोलिंगची धडकी, म्हणून उचलले थेट ‘हे’ पाऊल…
यासोबतच लग्नपत्रिकेसोबत अक्षता देऊन तादंळाची नासाडी नको, कर्ज काढून बडेजाव करण्यापेक्षा तोच पैसा कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वापरावा, असे आवाहनही समाजाकडून करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी महिला कार्यकर्त्याची भीष्म प्रतिज्ञा
तसेच लग्न जमवताना जन्मकुंडली बघून लग्न करण्यापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व द्या, नाती जोडताना वराची नोकरी व मालमत्तेची कागदोपत्री माहिती तपासणी करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.