गुलाबराव पाटलांना ट्रोलिंगची धडकी, म्हणून उचलले थेट ‘हे’ पाऊल…

गुलाबराव पाटलांना ट्रोलिंगची धडकी, म्हणून उचलले थेट ‘हे’ पाऊल…

जळगाव : राज्यातील सत्ता संघर्षानंतर सोशल मीडियावर शिंदे गटाच्या आमदारांना नेटकरांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. राजकीय मैदानात विरोधकांना आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपल्या फेसबुक (Facebook) वरील कमेंटचा पर्याय बंद करून टाकला आहे.

गेल्या काही वर्षापासून सोशल मीडिया हे माध्यम वाढले आहे. जनतेसोबत थेट संपर्काचे हे माध्यम असल्याने सर्वच राजकीय नेते सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर नेत्यांचे पेज असल्याने सोशल मीडियावरील नेटिझन्स आपल्या समस्या, आपले विचार थेट नेत्यांपर्यंत मांडू शकतात, तर नेत्यांच्या काही गोष्टी आवडल्या नाहीत तर नेत्यांवर थेट टीका देखील नेटिझन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात.

Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

त्यात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोलची भीती वाढली आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ट्रोलचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या उद्घाटनाचे फोटो पालकमंत्र्याच्या फेसबुक पेजवरून वायरल झाले होते.

मात्र शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. मात्र नेटिझन्सकडून त्याला ट्रोल केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी फेसबुकवरील पेजचा कमेंटचा पर्याय बंद केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube