महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे (MNS) घेण्यावरुन झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur) घडली होती. या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आला असून 5 जणांना अटकही करण्यात आली आहे.
बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यामुळे, या घटनेनंतर सोलापुरात तणाव निर्माण झाला असून विविध राजकीय पक्षाचे नेते पुढे येऊन भूमिका मांडत आहेत. मनसे नते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबीयांचा आक्रोश गहिवरुन टाकणारा होता.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरे घरी पोहोल्यानंर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. तुमचं राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून येवो पण राजकारणासाठी कोणाचा जीवा जाता कामा नये. मी यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले. तर, सरवदे कुटुंबीयांना भेट देत त्यांनी सांत्वन केलं. यावेळी, ‘माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही’, असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला.
धक्कादायक! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं, भाजपच्या दोन गटांत वाद
सोलापुरात राजकीय वादातून हत्या झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी आणि कुटुंबीयांनी अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. त्यावेळी, अमित ठाकरेंनाही गहिवरुन आलं होतं. ‘येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, त्यातूनच येथे वाद झाला, यापूर्वी आमचं कोणतही भांडण नव्हतं. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालंय, सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई कराय’, अशी मागणी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी केली आहे.
सोलापुरात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून दोन गटात झालेल्या राजकीय वादात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. या हत्येनंतर मनसे नेते अमित ठाकरेंनी आज मयत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीपूर्वी हत्येचा घटनाक्रम कुटुंबियांनी एबीपी माझाशी बोलताना किरण देशमुख आणि भाजप आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, भाजपच्या माजी नगरसेविका, प्रभाग 2 मधील उमेदवार शालन शिंदे, तीचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणावर हत्येचा गुन्हा पोलिसांनी नोंद केलाय.
काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता. बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही मूक आंदोलन केलं आहे. सरवदे कुटुंबियांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. भाजपाची सत्तेसाठी जी भूक आहे, जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. भाजपचा खरा चेहरा आज सर्वांच्यासमोर आला आहे. फक्त पैसा आणि सत्ताच नाही तर ते आता रक्तावर येऊन थांबलेत, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला.
लोकांच्या सेवेसाठी नाही तर लोकांचे जीव घेऊन त्याना सत्तेत यायचं आहे. दोन कुटुंबामध्ये भांडण आणि एका निरागस माणसाचा जीव यांनी सत्तेसाठी घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते हे आज सिद्ध झालं. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई राक्षसी भाजप विरोधात सुरूच राहिलं, असेही त्यांनी म्हटले. जर लोकांचं बळी घेऊन तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज 100 पट बरे होते. सत्तेचा इतका माज असेल तर निवडणूक चुलीत घाला आणि 50-100 वर्ष सत्ता भोगून घ्या असं शरद कोळी म्हणाले आहेत.
