खळबळजनक! अजित पवार गटाच्या युवक नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; माजी उपमहापौरांसह 7 जणांविरोधात FIR

खळबळजनक! अजित पवार गटाच्या युवक नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; माजी उपमहापौरांसह 7 जणांविरोधात FIR

NCP Youth Leader Omkar Hazare End Life In Solapur : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Omkar Hazare End Life) आलाय. आठ जून रोजी कोणाला न सांगता ओंकार हजारे हा घराबाहेर (Solapur Crime) पडला होता. मात्र, बराच वेळ घरी न आल्यामुळे शोधाशोध घेतल्यानंतर सुपर मार्केट येथे ओंकार हजारे हा कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

आत्महत्या प्रकरण

ओंकार हजारे हा अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून कार्यरत होता. ओंकार हजारे यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर नाना काळे, पत्नी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर पवार, जयश्री पवार, मंगेश पवार, निखिल बनसोडे, ओम घाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार आणि स्वाती यांचा 2019 साली प्रेम विवाह झाला होता. स्वातीच्या कुटुंबीयांचा प्रेम विवाहाला विरोध होता. त्यामुळे ओंकारला त्रास देत होते.

पुणे हादरलं! सेल्फी काढला ‘पुन्हा येईल’ सांगितलं; डिलिव्हरीच्या बहाण्याने तरूणीवर बलात्कार…

ओंकारने आठ जून रोजी समाज माध्यमांवर एक स्टेटस ठेवलं होतं. यामध्ये त्याने सासरची मंडळी आणि माजी उपमहापौर नाना काळे त्रास देत असल्याचं म्हटलं होतं. स्वाती ओंकारकडे घटस्फोट मागत होती. त्यासाठी सासरची मंडळी आणि नाना काळे त्रास देत असल्यामुळेच आत्महत्या केली, या कारणावरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सात जणांवर गुन्हा दाखल

या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर नाना काळे, पत्नी स्वाती हजारे, तसेच ज्ञानेश्वर पवार, जयश्री पवार, मंगेश पवार, निखिल बनसोडे अन् ओम घाडगे या सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. FIR मध्ये त्यांनी ओंकारला कुटुंबीय व सासरच्या कडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती हजारे यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु सासरच्या मंडळींनी, विशेषतः नाना काळे यांनी त्यांच्यावर दबाव आणत त्रास दिल्याची तक्रार आहे.

छाती ठोकून सांगतो, होय…गुवाहाटीला गेलो; बच्चू कडूंनी केला खळबळजनक खुलासा

पुढील कारवाईची दिशा

FIR नोंदविल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. पुढील माहिती मिळण्याच्या आधी तपासाच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये मानसिक त्रास, घरातील तणाव, आणि कुटुंबीय आणि सत्ता दबाव या घटकांचा समावेश होणार आहे. आत्महत्येच्या कारणांचा तपास करताना विष प्राशनाचा संदर्भ, गाडीतील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज, आणि पोस्टमोर्टम रिपोर्ट तपासले जातील.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube