Download App

अहमदनगरच्या कापड बाजारात गुंडगिरी, व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते.

दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या पोटावर मोठ्या प्रमाणात वार झाले आहेत. हल्ला करणाऱ्या गुंडांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

नवलानी यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलमध्ये जावून व्यापाऱ्याची विचारपूस केली आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

कापड बाजार येथे गाडी लावण्यावरून दीपक नवलानी या व्यापाऱ्याशी काही जणांनी हुज्जत घातली. त्यानंतर नवलानी व इतर दाेन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. त्यात नवलानी गंभीर जखमी झाले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. बाजारातील दुकाने बंद करण्यात आली होती.

तर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचीही धावपळ उडाली होती. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळाला जिल्हा पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती.

Tags

follow us