Download App

Ahmednagar Crime : नायब तहसीलदारासह चौघांवर जीवघेणा हल्ला…

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हासनापूर शिवारात काल रात्रीच्या सुमारास नायब तहसीलदारांसह चार जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत महसुलचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार कारवाईसाठी परीक्षाविधिन तहसीलदार गुरव अव्वल कारकून रवींद्र सानप, तलाठी सचिन लोहकरे व सोमनाथ आमने यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी गेले.

गरजेपेक्षा जास्त लिंबाचे सेवन ठरते घातक

तेथे गौणखनिज मुरुमाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा केला असता, तो ट्रॅक्टर थांबवून पसार झाला. थोड्या वेळात तिथे अर्जुन ढाकणे आला व उर्मट भाषेत बोलू लागला. त्यानंतर तेथे विठ्ठल ढाकणे व अंगद ढाकणे हे दोघे एका दुचाकीवर काठ्या व लोखंडी गज घेऊन आले.

Bholaa Box Office Collection: चौथ्या दिवशी चित्रपटानं कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!

हे दोघे तेथे येताच त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पथकाने ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काठ्या व लोखंडी गजाने पथकाला मारहाण केली. या प्रकरणी परीक्षाविधीन तहसीलदार राहुल गुरव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

राहुल गुरव यांच्या फिर्यादीवरून अर्जुन विष्णू ढाकणे, विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे व अंगद अर्जुन ढाकणे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us