Nana Patole ; माझी तब्येत ठणठणीत, माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होत असेल
मुंबई : काल मला दिल्लीला बोलवण्यात आले होते. सुरतच्या दौऱ्याचं नियोजन होतं. माध्यामात सांगण्यात आले की माझी तब्येत चांगली नव्हती म्हणून मी आलो नाही. माझी तब्येत चांगली असते माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होत असेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लागवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा (Vajramuth Sabha) झाली या सभेला नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे नाना पटोले काँग्रेस नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
काल रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली. विरोधकांची वज्रमुठ काँग्रेसमुळे कमकुवत ठरतीय का? हा प्रश्न कालपासून उपस्थित केला जात होता. याचं कारण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभेला गैरहजर होते. नाना पटोले यांच्या ऐवजी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाषण केले. नाना पटोले नेमकं कशामुळे येऊ शकले नाहीत हे सांगण्यात आले नव्हते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांची तब्येत खराब असल्याचे होते.
फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत; भाजप नेते सुभाष देशमुखांचं भाषण व्हायरल
वज्रमुठ सभेतील उपस्थितीवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला आहे. ते म्हणाले की, मी काल दिल्लीत आलो होतो आणि आज सुरत मध्ये आहे. माझी तब्येत ठणठणीत आहे. माझ्या तब्येतीचे कोणतेही कारण नव्हतं. पक्षाच्या कार्यक्रमासाठी माझे दौरे सुरु आहेत. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते सभेसाठी हजर होते आणि महाविकास आघाडीची सभा झाली, असे नाना पटोले यांनी सांगितेल.
महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांची तब्येत खराब असल्याचे सांगत होते. यावर नाना पटोले म्हणाले की, कोणाचा गैरसमज झाला असेल. माझी तब्येत चांगली आहे. पक्षाच्या कामानिमित्त मी दिल्लीत होतो. दिल्लीत मिटिंग सुरु होत्या त्यामुळे माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. आमच्या नेत्यांना सभेला जाण्यासाठी आणि भाषण करण्याचे कळवले होते. आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असेही स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.