फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत; भाजप नेते सुभाष देशमुखांचं भाषण व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T140455.769

Subhash Deshmukh On Devendra Fadanvis :  भाजप नेते व माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे एक वक्तव्य चर्चेत आलेले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना असे वक्तव्य केले की त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांवर फिदा झालेत असे विधान त्यांनी केले आहेत.

यावेळी देशमुख हे सोलापूर शहरामध्ये वॉर्ड नंबर 26 मधील कल्याणनगर भागात बोलत होते. यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष देशमुख म्हणाले, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थसंकल्पामध्ये फडणवीसांनी महिलांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे, असे ते म्हणाले.

“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

मुलगी शिकायला गेल्यावर त्यांनी 4 हजार रुपये देणार, पाचवी-सहावीला गेल्यावर 6 हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 15-18 हजार रुपये देणार असे फडणवीसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मला असे वाटते की मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहित नाही, पण यावेळी देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असे देशमुख म्हणाले आहेत.

MahaVikas Aghadi : …म्हणून उद्धव ठाकरेंना मोठी खुर्ची, अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

 

पुढे देशमुख म्हणाले की, महिलांच्या बचतगटांच्या उत्पादनाला मुंबईत बाजार मिळाला म्हणून तिथे बचतगटाचे मॉल तयार करायचे ठरवले आहे. कारण सर्वात मोठा बाजार मुंबईत आहेत, असे त्यांनी सांगितलेत. पण त्यांनी फडणवीसांवरुन केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

 

 

Tags

follow us