Bholaa Box Office Collection: चौथ्या दिवशी चित्रपटानं कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!
Box Office Collection : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. (Box Office Collection) या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘भोला’ (Bholaa ) ची सुरुवात जरी ठीक- ठाक राहिली असली तरी वीकेंडला कमाईत चांगलीच वाढ झाली. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा सारखी आहे.
#Bholaa puts up a healthy score in its *extended* 4-day weekend… The spike on Sat and Sun added strength to its overall total… Thu 11.20 cr, Fri 7.40 cr, Sat 12.20 cr, Sun 13.48 cr. Total: ₹ 44.28 cr. #India biz.#Bholaa needs to maintain the momentum over weekdays… In fact,… pic.twitter.com/RQKL7quyrq
— taran adarsh (@taran_adarsh) April 3, 2023
मात्र संपूर्ण देशभरात चाहत्यांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत काही बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न केला आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, संजय मिश्रा, आमला पॉल आणि दीपक डोब्रियाल यांच्या भूमिका आहेत.
अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाने शनिवारी (1 एप्रिल) 12.10 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर भोला चित्रपटानं चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (2 एप्रिल) तब्बल 14 कोटींचे कलेक्शन केला आहे. यानंतर आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 44.70 कोटी रुपये झाले आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याची चेच रंगत आहे. अजय देवगणने ‘भोला’ दिग्दर्शित केला आहे.
जबरदस्त! ‘मनसेच्या नव्या’ गाण्यावर प्राजक्ता माळी दिलसे नाचली; Viral Video एकदा पाहाच…
याअगोदर त्याने ‘यू मी और हम’, ‘शिवाय’ आणि ‘रनवे 34’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराज यांनी केलं होतं. अजयच्या ‘दृष्यम-2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता त्याचा भोला हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये शामिल होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.