Download App

मणिपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध! काळी फित बांधून केलं ‘मौन निषेध’ आंदोलन…

Ahmednagar News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून ‘मौन निषेध’ करण्यात आला. तसेच महिलांवरील अत्याचाराचाही निषेध करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या लग्नाची राज्यभर चर्चा; स्मशानात घेतल्या साता जन्माच्या आणाभाका

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून याचे पडसाद देशातील विविध राज्यात उमटत आहेत. राज्यात दोन समाजामध्ये वाढलेला तणाव लक्षात घेऊन मणिपूर राज्य सरकारच्यावतीने यापूर्वीच योग्य उपाययोजना व कठोर कार्यवाही करणे अपेक्षित होते पण सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप फाळके यांनी केला आहे.

आज देशात महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून कोणालाही कायद्याची भीती राहिलेली नाही हे वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरून स्पष्ट होत चालले आहे. यामुळे देशातील सर्व महिला वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. अशावेळी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लाखो भारतीयांचे जीव वाचणार; लष्कराला मिळाले अपघात नियंत्रण प्रणालीचे पेटंट

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरांनीही संताप व्यक्त केला असून ते म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संवेदनशील परिस्थिती असताना देखील केंद्र व मणिपूर राज्य सरकारने अद्यापपर्यंत मौन बाळगलेले आहे. त्यानंतर विविध समाजमाध्यमांनी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा हा मुद्दा उचलल्यावर देखील केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही हे विशेष. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारला खडेबोल सुनवावे लागले हे सरकारचे दुर्देव असल्याचं कळमकर म्हणाले आहेत.

मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर काळी फित बांधून व निषेध मौन बाळगून मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत निषेध करण्यात आला तसेच या घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, नामदेव पवार, अशोक बाबर, किसन लोटके, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, पापामिया पटेल, फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा, बबन भिंगारदिवे, फराज पठाण, निखिल शेलार, उमेश भांबरकर, सागर शहाणे, अभिषेक जगताप आदीसह शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us