अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात झालेल्या दगडफेकीनंतर सामना वडापावचे अन्सार चाचा यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्ही जर गुण्यागोविदांने राहिले तर अशा भानगडी उद्भभवनार नसल्याचं मत त्यांनी यावेळी केलंय. तसेच मायबाप तुम्ही भांडणं करु नका, माझी हात जोडून विनंती असल्याचंही ते म्हणाले आहेत.
संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत
अन्सार चाचा म्हणाले, मायबाप तुम्हाला आम्ही हात जोडून विनंती करीत आहोत, सर्वांनी गोडीगुलाबीने, प्रेमाने, गुण्यागोविंदाने वागावं, भांडणे करुन काहीही साध्य होणार नाही, त्यामध्ये आपल्या देशाचच नूकसान असल्याचं त्यांनी म्हटलंय.
संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत
तसेच आजचं जे भांडण झालंय ते आमच्या गावच्या एकाही माणसाने केलेले नाहीत. रस्त्यावर जे लोकं चाललेले होते त्यांनी हे केलं असून प्रशासनाकडे त्यांचे फोटो आहेत. प्रशानस त्यांच्यावर कारवाई करणारच त्याच्याबद्दल दुमत नसल्याचं ते म्हणाले आहेत.
WTC Final 2023 : रोहित शर्माचं कसोटी सामन्यांचं अर्धशतक
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांकडून संगमनेरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. या मोर्चादरम्यान समनापूर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली.
दगडफेकीत चार चाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत सतरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण हे संगमनेर व राहाता तालुक्यातील आहेत.