Ashadhi Wari 2023 : खारघरनंतर सरकार सावध, वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना

Ashadhi Wari 2023 : खारघरनंतर सरकार सावध, वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना

Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांसह इतर अनेक पालख्यांचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यासाठी, वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ( State government Ready for Ashadhi Wari 2023 after Kharghar tragedy )

Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये तसेच कोणाचाही बळी जाऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघाताने 15 जणांचे बळी गेले होते. त्यावरुन राज्यभरात बराच वाद झाला. या प्रकरणानंतर राज्यात दिवसा 12 ते 5 या दरम्यान कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता आषाढी वारीसाठी राज्यासरकारने आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जेजुरी विश्वस्तांचा प्रश्न सुटला; ग्रामस्थांच्या लढ्याला मोठं यश

आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीत जय्यत तयारी सुरू झाली असून राज्यात इतर पालख्यांच प्रस्थान देखील झालं आहे. ज्यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आणि अमरावतीतील रूख्मीणी मातेची पालखी यांचा समावेश आहे. दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी खारघर दुर्घटनेप्रमाणे काही घडू नये यासाठी आळंदीत आणि देहूत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली आहे. आपत्कालीन 108 सेवेच्या आणि 102 सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या आहेत. वारीच्या काळात कोणत्याही वारकऱ्याला त्रास होणार नाही. याची काळजी घेण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या सूचना :

– कृती आराखड्यात सर्व दिंडीमार्गांचा विचार करावा
– प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या विचारात घ्यावी
– दिंडीमार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यरत असावे
– दिंडीमार्गावर आरोग्य सुविधा मनुष्यबळ आणि औषधांसह सज्ज असावी
– या दवाखान्यातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं ठळक लिहावित
– उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
– दिंडीमार्गांचे गटांमध्ये विभाजन करून अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात
– एकादशीपूर्वी दर आठवड्याला या तयारीचा आढावा घ्यावा
-दिंडीमार्गावर कलापथक व समुपदेशनातून जागृती करावी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube