Download App

Ahmednagar News : प्रत्येक उपकरणाचं मूळतत्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, नरेंद्र फिरोदिया यांचं आवाहन

अहमदनगर : अहमदनगर शहरातील बजरंग विद्यालयात आज 50 वे शहरास्तरीय गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Javle) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दीप प्रज्वलन करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे.

गणिताचे जीवनातील महत्त्व विज्ञानाचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करुन ज्यांचे गणित चांगले ते जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येक उपकरणाचे मूळतत्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, कार्यक्रमात मुख्याध्यापिका संगीता पाठक यांनी तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तयार केलेले विविध उपक्रमांची माहिती दिली असून तसेच आपल्या मनोगत तृणधान्याचे महत्त्व विशद केलं आहे. तर जिल्हा वाचनालयाचे उपाध्यक्ष अनंत देसाईंनी आपल्या मनोगतामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा देऊन आभार मानले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित संघाचे अध्यक्ष विष्णू मगर यांनी करत त्यांनी प्रस्ताविका त्यांनी प्रदर्शनाची रूपरेषा तसेच मूल्यमापन करण्याची पद्धती सांगितली. या उपक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा गणित संघटनेचे अध्यक्ष संजयकुमार निकड यांनी संस्थेचे अध्यक्ष, सहसचिव, प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन व आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले.

प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, संगीता पाठक, प्राथमिकचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, दत्तू कुंजीर, मिठू देवकर, मनीषा टेमकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संजयकुमार निक्रड, विष्णू मगर, दीपक शिंदे, सुखदेव नागरे, अमोल देशमुख, विजय सावळे, रायकर, कुलकर्णी, शारदा होशिंग, काजल महांडुळे, क्रांती मंदणकर, प्रिया जोशी, दिपिका मेहता आदींनी परिश्रम घेतले आहे. तर मनिषा मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.

दरम्यान, याप्रसंगी नरेंद्र फिरोदिया, उमेश गांधी, अनंत देसाई, सुनील पंडित, भाऊसाहेब थोरात, जुबेर पठाण, अरुण पालवे, आशुतोष घाणेकर, संजयकुमार निक्रड, विष्णू मगर, सुखदेव नागरे, दीपक शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी लंके, बाबासाहेब शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Tags

follow us