पुणे : पुण्यात काल झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेते दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधिंकडून अशी निवड केली जाते.
काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा
काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा
नानासाहेब जाधव यांनी मृद व जलसंधारण (Soil and Water Conservation) या विषयातील पदव्युत्तर (एम. टेक) शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी संघाचे पूर्णवेळ (प्रचारक) म्हणून काम केलं. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर तालुक्यात प्रचारक म्हणून आणि नंतर जळगाव जिल्ह्याचे प्रचारक म्हणून तब्बल सहा वर्ष काम केले.
त्यानंतर ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, धुळे येथे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी म. फु. कृषी विद्यापीठाच्या राहुरी येथील प्रक्षेत्र संचालनालाय, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व शेती संशोधन प्रकल्प राहुरी येथे प्राध्यापक व शास्त्रज्ञ या पदांवर कार्यरत होते. 2012 मध्ये ते कृषी विद्यापीठातून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना संघात शाखा मुख्याशिक्षक, जिल्हा शारिरीक प्रमुख या पदांवर कार्य केले. प्रचारक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हा सहकार्यवाह, विभाग सहकार्यवाह, विभाग कार्यवाह आणि पुढं 2001 पासून पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह, प्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
2011 ला प्रांत सहसंघचालक पदांवर व 2013 ला प्रांत संघचालक या पदांवर त्यांची नियुक्ती झाली. 2015 मध्ये त्यांची महाराष्ट्र मा. संघचालक या पदावर निवड झाली. तेव्हापासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत त्यांची 2015, 2018, 2021 आणि आता 2024 अशी चारवेळा प्रांत संघचालक पदावर निवड झालेली आहे.