काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा
Ajit Pawar On Manoj Jarane : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (25 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जरांगे म्हणाले. त्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. त्यानंतर आत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी जरांगे यांचे नाव न घेता टीका केली आहे.
अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी संपूर्ण कामाला लागलं आहे. घटनेने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. पण आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय? हे जरा पाहिलं पाहिजे. काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि एसपी यांच्याशी शिवराळ भाषा वापरतात. एवढं धाडस कसं होतं, याची सखोल चौकशी करण्याची गजर आहे, असं अजित पवार म्हणाले
‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले
पुढं ते म्हणाले, आपल्या मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याला शपथ घेऊन आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. राज्याचे प्रमुख दोनवेळा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, आरक्षणावर तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोनदा आंदोलकांची भेट घेतली, असं अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, देवेंद्रजींनी निर्णय घेतला होता. पण हे आरक्षण कोर्टात टिकलं नाी. त्यामुळं आता सरकार बारकारईने काम करत आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न करतयं. मात्र, काहीजण जाणीवपूर्वक काहीही बोलत आहे. मुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषा वारपली जाते. अशी पध्दत महगाराष्ट्र्त कधीही नव्हती. पण, कोणीही गैरसमज करू नये की काहीही बोलले की खपते. सर्वांना कायदा समान आहे, हे विसरू नये, असा इशारा जरांगे पाटलांना दिला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरणं सरकारने घेतलं आहे. राज्यातही गुंतवणूक येत असल्याचे ते म्हणाले.