Download App

कोलकात्यातील अत्याचार प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाही, अन् आता…; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी शब्दानेही या घटनेचा निषेध केला नाही. पण महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र, हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करू लागले,

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : बदलापूरमधील (Badlapur) एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur School Case) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. विरोधकांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis)राजीनाम्याची केली. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तापसी पन्नूला ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटासाठी OTT वर मिळाले प्रेक्षक आणि समीक्षकांचे प्रेम 

कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी शब्दानेही या घटनेचा निषेध केला नाही. पण महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र, हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करू लागले, असं फडणवीस म्हणाले.

महायुतीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज कोल्हापुरात पार पडला. या मेळाव्यादरम्यान देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, राज्यात काही दुर्देवी घटना घडल्या. या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. आम्ही (महायुती) आता ठरवलं आहे की, अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, महिलांवरील अत्याचार आणि अशा प्रकारची परिस्थिती आम्ही खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मला एक गोष्ट सांगायची आहे की, मुलगी कोणतीही असो ती आपलीच असते. कोलकात्यामध्ये एका डॉक्टर तरुणीवर अमानुष अत्याचार झाले. अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, मात्र महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाहीत. कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतरही हे लोक ममता बॅनर्जींचं कौतुक करत राहिले. त्यांनी एका शब्दानेही या घटनेचा निषेध केला नाही. पण महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र, हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारच्या मागण्या करू लागले.

टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम काय कळणार?, फडणवीसांचे टीकास्त्र 

नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही
फडणवीस म्हणाले, मी या लोकांना एवढंच सांगतो, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे, रडायचं नाही लढायचं. आम्ही पळून जाणारे नाहीत. आम्ही लढणारे आहोत. अशा प्रकरणामधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. काहीही झाले तरी चालेल या नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. ही गोष्ट विरोधकांना ठणकाऊन सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या. कारण ते संवेदनाहीन आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

follow us