टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम काय कळणार?, फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis : महायुती (Mahayuti) सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojna) आणली. या बहुचर्चित योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis) विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. टीका करणारे संवेदनाहीन लोक असून त्यांना बहिणींचं प्रेम कधीच कळणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय? VIP अन् नेत्यांना किती प्रकारची सुरक्षा, जाणून घ्या डिटेल…
महायुतीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज कोल्हापुरात पार पडला. या मेळाव्यादरम्यान देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, सदाभाऊ खोत आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करतांना फडणवीस म्हणाले की, महिलांचा विकास झाला तरच राज्याचा विकास होऊ शकतो. विकसित राज्य, विकसित राष्ट्र निर्माण करायचे असेल तर स्त्री सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी महिला सक्षणीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला, असं फडणवीस म्हणाले.
Emergency: रिलीजपूर्वीच वादात अडकला कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’; ‘या’ कारणामुळे होतोय विरोध
पुढं ते म्हणाले, लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना दिले जातोय. यावरून विरोधक टीका करतात. महिलांना विकत घेताय का? लाच देताय का? अशी टीका काही लोक करतात. खरंतर अशी टीका करणारे लोक संवेदनहीन लोक आहेत. त्यांना बहिणींचा प्रेम समजू शकत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
योजना बंद पडली पाहिजे यासाठी विरोधकांचे प्रयत्न
पुढं ते म्हणाले की, ही योजना बंद पडली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विरोधक कोर्टातही गेले. मात्र, कोर्टाने लाडक्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला. लाडक्या बहिणींनो, काळीज करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असेल तरी दर महिन्याला पैसे मिळत राहतील, याची तरदूत अर्थसंकल्पात केली. ही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
पैसे परत काढून घेतील ही विरोधकांची थाप
तर अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार काम करणारं सरकार असून वेळकाढूपणा करणारं सरकार नाही, हौशे, गौशे, नौशे बोलतात की पैसे परत काढून घेतील विरोधकांची ही थाप असून जनतेला दिलेले पैसे कोणताच माय का लाल काढून घेऊ शकत नाही, तरीही विरोधक गैरसमज करीत आहेत. सरकारबद्दल अविश्वास निर्माण करण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे. विरोधकांच्या या गोष्टीला बळी पडू नका. सरकार चालवताना आम्ही महिला, शेतकरी, वारकरी, युवक, समाजातील सर्व घटकांसाठी योजना आणल्या आहेत, कोणालाही वंचित ठेवलं नाही, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.