Download App

मढी देवस्थानचा मोठा निर्णय, तिखटाचा नैवेद्य नको, तर…

अहमदनगर : होळीला (Holi 2023) सुरु झालेल्या मढीच्या यात्रेत (Madhi Yatra) लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. कानिफनाथांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. रंगपंचमी ते गुढीपाडवा (Gudhipadva) या कालावधीत मढी यात्रेचा तिसरा आणि अंतिम टप्पा असतो. कानिफनाथ मंदिर परिसर आणि मढी हद्दीत पशुहत्या करू नका, असे अवाहन देवस्थान समितीने केले आहे.

कानिफनाथाला मलिदा, रेवडी असा गोड पदार्थांचा नैवेद्य असल्याची मढी येथील हजारो वर्षाची परंपरा आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी गोड नैवेद्य करावा. कानिफनाथ मंदिर परिसर आणि मढी हद्दीत पशुहत्या करू नका, असे आवाहन मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड आणि देवस्थान समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.  

सांगलीच्या जतमध्ये भरदिवसा नगरसेवकाचा गोळ्या झाडून खून

मढी यात्रेला 6 मार्चला प्रारंभ झाला आहे. गुढीपाडव्याच्या महापूजेने यात्रेची सांगता होईल. मढी यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात जातपंचायती आणि न्यायनिवडे चालत होते. पण न्यायालयाने बंदी घातल्यानंतर येथील जातपंचायती आणि न्यायनिवाडे बंद झाले आहे. त्यामुळे पंधरा दिवस चालणारी मढी यात्रा आता पाच दिवसांवर आली आहे .

यात्रेचा तिसरा टप्पा फुलबाग यात्रेचा असून रंगपंचमी झाल्यानंतर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होतात. पशुहत्या केलेला नैवेद नाथ संप्रदायाला मान्य नाही. नाथाला, रेवडी, मलिदा असा गोड पदार्थांचा नैवेद्य भाविक करतात. त्यामुळे कानिफनाथ मंदिर आणि मढी परिसरात भाविकांनी पशुहत्या करु नये, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

follow us