Gram Panchayat elections : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचे निकाल निकाल होती आहे आहेत. यामध्ये भाजप पुन्हा राज्यातील नंबर एकच पक्ष ठरला आहे. तर भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसनेही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तसेच पंढरपुरात भाजपचे आमदार विजयसिंह मोहिते पाटील (MLA Vijaysingh Mohite Patil) यांना मोठा फटका बसला आहे. माळशिरसमध्ये (Malshiraj Gram Panchayat Election) 30 वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झाले आहे.
काटेवाडीत अजित पवारच ‘दादा’; शिंदे गटाकडून वळसे-पाटलांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
माळशिरस ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीच्या नंदा नामदास यांची सरपंचपदी निवड झाली आहे. ही ग्रामपंचायत गेली ३० वर्षे भाजपच्या ताब्यात होती. मात्र, राष्ट्रवादीने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून एकहाती सत्ता मिळवली आहे. आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजप आमदार संजय कुटेंचा धक्का पराभव
तर दुसरीकडे बुलढाण्यातील आमदार संजय कुंटे यांना आपल्या होम ग्राऊंडवच मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत जामोदमध्ये काँग्रेसने नेत्रदीपक विजय मिळविला आहे. काँग्रेस पॅनलच्या उमेदवार गंगूबाई दामधर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. भाजपच्या उमेदवार अर्जना राऊत यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे जामोदमध्ये काँग्रेसची ताकद वाढली असून भाजपचा ताण वाढला आहे.
शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का
आमदार शहाजी पाटील यांनी स्वत:चे गाव असलेल्या चिकमहूड ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. आमदार पाटील यांच्या पॅनलने 15 पैकी 14 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गावची ग्रामपंचायत राखली असली तरी तालुक्यातील इतर तीन ग्रामपंचाती शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या आहेत. खवासपूर ग्रामपंचायत शहाजीबापूंच्या हातातून गेली आहे. या ग्रामपंचायतीवर शेकापने ताबा मिळवला आहे. शेकापचे संजय दीक्षित हे सरपंचपदी निवडून आले आहेत. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिरूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणल्या जाणाऱ्या रांजणगाव ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीत अजित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.