Download App

मोठी घडामोड! हातकणंगलेसाठी भाजपच्या हाय कमांडचा राजू शेट्टींना फोन…?

Raju Shetty : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. अशातच सर्वच् पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष वेधलं आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी भाजपच्या हाय कमांड नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांना फोन केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही भावावर ठेवला का? आता वर्तुळ पूर्ण…; शर्मिला ठाकरेंची खोचक टीका

हातकणंगले मतदारसंघातून सध्या महायुतीचे खासदार धैर्यशील माने विद्यमान आहेत. अद्याप माने यांच्या उमेदवारीबाबत अस्पष्टताच असून या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजपच्या हाय कमांड नेत्यांनी डाव साधल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय शिष्टमंडळातील नेत्याकडून शेतकरी नेते राजू शेट्टी यांना संपर्क करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपसोबत येण्याबाबतची विनवणीही करण्यात आली आहे. या बातमीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

राज्यातील शेतकऱ्यांचा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी नाळ जुळलेला शेतकरी नेता म्हणूनही शेट्टी यांना ओळखलं जातं. त्यामुळेच मुंडे यांनी शेट्टी यांचा हात धरत 2014 च्या लोकसभआ निवडणुकीआधी त्यांना भाजपसोबत नेत युती घडवून आणली होती. या काळात शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध धोरणांमध्ये केंद्र सरकारला योग्य मार्गदर्शनही केलं. शेट्टी यांच्या मार्गदर्शनाचा भाजपला मोठ्या प्रमाणात फायदाही झाला खर पण काही धोरणे राबवण्यात आल्याने शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ घातला. यासोबतच विविध कारणांमुळे राजू शेट्टी यांचं आणि भाजपचं जमलं नसल्याचं पाहायला मिळालं. भाजपची साथ सोडून त्यानंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या गोठ्यात गेले खरे मात्र, महाविकास आघाडीकडूनही भाजपसारखीच भूमिका घेण्यात आली. मात्र, शेतऱ्यांसोबत त्यांना नाळ असल्याने आगामी निवडणुकीत त्यांनी दोन्ही पक्षांना बाजूला सारलं.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यातील अनेक नेत्यांना संपर्क सुरु असल्याचंही समोर येत असून काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनाही भाजपकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यातच आता राजू शेट्टी यांनाही संपर्क केला असल्याचं समोर येत आहे. सध्या भाजपकडे शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत माहित असलेल्या नेत्यांची कमी आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारत राजू शेट्टी यांनी आत्तापर्यंत अनेक समस्या सोडवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे जर राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजपमध्ये शेतकऱी नेत्याची कमी भरुन निघणार आहे.

follow us

वेब स्टोरीज