मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही भावावर ठेवला का? आता वर्तुळ पूर्ण…; शर्मिला ठाकरेंची खोचक टीका
Sharmila Thackeray : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) १० जानेवारीला शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निकाला दिला. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं. नार्वेकरांच्या या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा घटनाविरोधी निर्णय असल्याचं म्हटलं. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही (Sharmila Thackeray) यावर प्रतिक्रिया दिली, वर्तुळ पूर्ण झालंय, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.
‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’; अंधारेंचा खोचक टोला…
राहुल नार्वेकरांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. तसेच शिंदे गटाच्या 16 आमदारांची मान्यता कायम ठेवण्यात आली.
दरम्यान, काल उद्धव ठाकरेंनी जनता अदालत घेऊन नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वकील असीम सरोदे यांनीही नार्वेकर यांचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे स्पष्ट केले. त्यानंतर आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या सर्व घडामोडींवर बोलतांना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, या महिन्याच्या दहा तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. शिवसेनतील ज्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळं बाहेर पडायला लागलं होतं, त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटला, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मनसे विक्रोळी महोत्सावता त्या बोलत होत्या.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
याआधीही शर्मिला ठाकरे दिशा सालियन प्रकरणात यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यावर त्यांना पाठिंबा दिला होता. शर्मिला ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले होते. त्यावेळीही शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कडाडून विरोध केला होता. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही तुमच्या लहान भावावार विश्वास ठेवलात का, असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केला होता.
राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली होती?
ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राजकीय वैर राज्यात सर्वश्रुत आहे. शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागल्याचं सांगितल्या जातं. उद्धव आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना कंटाळून आपण शिवसेना सोडली. मी शिवसेना पक्ष सोडला तेव्हा माझ्याविषयी अपप्रचार केला गेला, असंही राज ठाकरेंनी अनेकदा बोलून दाखवलं.