धुळे : राज्यभरात सातत्याने होणारे रस्ते अपघात (Nashik Accident) हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत धुळे महापालिकेचे भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तृळात शोककळा पसरली आहे.
आज सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकजवळील वडाळीभोई नमोकार तीर्थ परिसरात नाशिकहून धुळ्याकडे येणारी कार आणि कंटेनर यांच्यात भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात धुळेच्या भाजप नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
Maratha Reservation : सामाजिक आरक्षणांची मर्यादा वाढवा; काँग्रेसच्या हैद्राबाद बैठकीत ठराव
नाशिक येथे उपचारासाठी गेलेल्या भूषण देवरे यांची विचारपूस करण्यासाठी किरण अहिरराव व त्यांचे साथीदार नाशिकला गेले होते. ते आज सकाळी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे परतत असताना हा अपघात झाला. भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळख असणारे भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे किरण अहिरराव हे अत्यंत प्रसिध्द होते. त्यांच्या अपघाती निधनाने शोककळा पसरली आहे.
मृत पावलेल्या किरण अहिरराव यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात ही त्यांच्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणून आणण्यापासून केली होती. यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत मेहेंदळे गटातून त्यांनी पत्नीला निवडून आल्यानंतर त्यांचा राजकीय प्रभाव वाढला.
त्यांच्या राजकीय कार्याची दखल घेऊन 2019 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने त्यांना आरक्षित गटातून उमेदवारी न देता खुल्या प्रवर्गातून तिकीट देऊनही किरण अहिरराव मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचेही ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांचा आक्रमकपणा पाहून भाजपनेही त्यांना स्थायी समिती सदस्यपदी संधी दिली होती.