Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात नूकत्याचं घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर आता एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडलीय. वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने अहमदनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हत्येच्या घटनेनंतर केडगावमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आता एका तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडे, हत्याकांड, अशा घटनांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नगर शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेरात एकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. हे सगळे सुरु असताना शेवगाव शहरात दुहेरी हत्याकांड झाले होते. नगर शहरासह सध्या जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजावरा उडालेला दिसून येत आहे.
पुण्यात दहशत पसरवणाऱ्या कोयता गॅंगच्या प्रमुखाची पोलिसांकडून धिंड
गुरुवारी सकाळी केडगाव येथील देवी मंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सदर व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती. हि घटना ताजी असताना पुन्हा एकदा नगर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली. शहरातील पाईपलाईन रोडवरील एका तरुणावर काही जणांनी शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या तरुणावर उपचार सुरु असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित तरुणाची रुग्णालायात जाऊन भेट देखील. दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या घटनांचा वाढला आलेख हा पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध करतो आहे.