पुण्यात दहशत पसरवणाऱ्या कोयता गॅंगच्या प्रमुखाची पोलिसांकडून धिंड

पुण्यात दहशत पसरवणाऱ्या कोयता गॅंगच्या प्रमुखाची पोलिसांकडून धिंड

Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगच्या (Koyta Gang) टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांनाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पुण्यातील अरणेश्वर भागात कोयता टोळीच्या दोन गटाने हातात कोयता आणि हत्यारे घेऊन १५ गाड्यांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी सहकार पोलिसांनी (Sahakar Police) आरोपींना अटक करून त्यांची परिसरातून धिंड काढली. (The Koyta gang leader rajabhau umap who is spreading terror in Pune rally by police)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

दोन दिवसांपूर्वी शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री दोन टोळक्याने 10 ते 15 वाहनांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली होती. तोडफोड करणाऱ्यांनी घरांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुण्यातील अरण्येश्वर परिसरात ही घटना घडली असून हा परिसर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ लक्ष्मण उमाप आणि त्याच्या अकरा साथीदारांनी पुण्यातील सहकार नगर परिसरात असलेल्या अरणेश्वरमध्ये ही तोडफोड केली होती. या तोडफोडीच्या घटनेप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 32 आरोपींना अटक केली आहे. पोलिस अटक करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी कोयता टोळी प्रमुख जठाळ्याची परिसरातून धिंड काढली.

धक्कादायक! चालकाला चालत्या बसमध्ये आला अटॅक; समोरून येणाऱ्या बसचीही धडक

दरम्या, एकीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगच्या गुंडाची पुणे पोलिसांकडून धिंड काढली जात आहे. असं असूनही पुण्यतात कोयता गॅंग पोलिसांना न जूमानता आपली दहशत पसरवत आहेत. त्यामुळं पोलिसांची जरब संपली की, काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान, कोयता टोळीवर वचक निर्माण करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube